Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 नंतर यहोशुआने त्या राजांचा वध केला आणि त्यांची मृत शरीरे पाच झाडांवर संध्याकाळपर्यंत तशीच टांगून ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारवून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लटकत राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:26
14 Iomraidhean Croise  

तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”


त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.


जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ते दोन अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांना सुळावर चढविण्यात आले. हे सर्व वृत्त राजाच्या समक्षतेत कारकिर्दीच्या इतिहासग्रंथात नोंदण्यात आले.


राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे;


त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.


याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”


यावर सर्व जमाव ओरडला, “त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”


आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्‍या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्‍यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील.


ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”


यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.


जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.


परंतु शमुवेलने म्हटले, “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan