Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:16
17 Iomraidhean Croise  

“राजे आणि सेनांनी पळ काढला आहे; घरी राहिलेल्या स्त्रिया लूट वाटून घेत आहेत.


जेव्हा तुम्ही मेंढवाड्यात पडून राहता, तेव्हा असे दिसते की जणू कबुतराच्या पंखांना चांदी असते आणि त्यांचे पाय चमकणार्‍या सोन्याने मढविलेले असतात.”


खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.


ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.


त्यानंतर यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसोबत गिलगाल येथील छावणीकडे परतला.


ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले,


तेव्हा अमोर्‍यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला.


तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.


कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.


आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.


रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.


नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan