Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:11
17 Iomraidhean Croise  

मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला;


संपूर्ण देशभर युद्ध पसरले, त्या दिवशी तलवारीपेक्षा घनदाट जंगलामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला.


“हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय?


जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो?


जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील.


ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?


पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.


त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.


याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.


म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.


कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”


तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमिकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले.


प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती.


आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan