Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू; मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 1:17
19 Iomraidhean Croise  

“आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”


याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”


दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत.


संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.


तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.


याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!


तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव.


तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील.


मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”


नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.


तेव्हा ते यहोशुआला म्हणाले, “जी आज्ञा तू आम्हाला दिली आहेस त्याप्रमाणे आम्ही करू आणि जिथे कुठे तू आम्हाला पाठवशील तिथे आम्ही जाऊ.


जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!”


तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.


मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”


त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.


ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”


परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan