Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 4:2
24 Iomraidhean Croise  

तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”


याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.


याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.


तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही.


परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.


हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.


हे याहवेह, तुमच्या मनाला पाझर फुटू द्या, आणखी किती विलंब लागणार? आपल्या सेवकांवर दया करा.


तेव्हा याहवेहने त्याविषयी अनुताप केला व जी विपत्ती आपल्या लोकांवर आणण्याचे म्हटले होते ती आणली नाही.


तेव्हा ज्यास मी सावध केले त्या राष्ट्राने आपल्या कुमार्गाबद्दल पश्चात्ताप केला, तर मी त्यांच्यावर दया करेन व माझ्या योजनेप्रमाणे त्यांचा नाश करणार नाही.


याहवेह, तुम्ही मला फसविले आणि मी फसलो; तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात. मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे; सर्वजण माझी थट्टा करतात.


आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.


‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे.


तेव्हा याहवेहचे मन द्रवले, “पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले.


मग याहवेहचे मन द्रवले. आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.”


परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.


जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.


कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”


तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.


तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?”


कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan