Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परंतु मनुष्य आणि पशू यांनी गोणताट नेसावेत; देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 3:8
23 Iomraidhean Croise  

तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.


ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात.


“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?


त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते; त्यांनी जे बनविले त्याने ते स्वतःला पांघरू शकत नाहीत. त्यांच्या कृती दुष्टतेच्या कृती आहेत, हिंसात्मक कृती करणे हेच त्यांच्या हातात आहे.


“म्हणून आता यहूदीयातील लोकांना आणि जे यरुशलेममध्ये राहतात, त्यांना सांग, ‘याहवेहचा संदेश ऐका: पाहा! मी तुमच्यासाठी विपत्ती तयार करीत आहे आणि तुमच्याविरुद्ध योजना आखीत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण दुष्ट मार्गापासून वळा, व तुमचे मार्ग व तुमचे आचरण सुधारा.’


त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल.


कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन.


जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”


त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’


म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”


एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्‍यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा.


मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.”


तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”


जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या.


तर मी प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि यहूदीया प्रांतातील लोकांना व गैरयहूदी लोकांना असा प्रचार केला की त्या सर्वांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळावे व पश्चात्तापास योग्य अशी फळे द्यावी.


यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी,


आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan