Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 3:5
21 Iomraidhean Croise  

जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला.


धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली.


आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी.


जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.


म्हणून इस्राएल लोकांनी होरेब पर्वताजवळ आपले दागिने काढून टाकले.


कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”


योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.


मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक


तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले.


तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.


एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्‍यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा.


त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली: “राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार: “कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.


न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.


न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.


यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार.


म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.


विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री आहे.


विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.


आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan