Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 2:2
26 Iomraidhean Croise  

त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले.


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.


संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.


कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.


कारण त्यांनी दुःखितांचे दुःख, तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही; त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.


या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.


हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.


दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.


तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता, म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.


कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता; अधोलोकाच्या तळापासून तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.


अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे; मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी— जगामध्ये जे सर्व पुढारी होते; जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते, ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत.


याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,


आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत अशा ठिकाणी मी तुला वसवीन.


म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.


कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील.


कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.


येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.


कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही.


येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यास जे समर्थ आहेत, त्यांच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली.


तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.”


दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan