Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ते सर्व एकमेकाला म्हणाले, “चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 1:7
18 Iomraidhean Croise  

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार महिना निवडण्यात आला.


मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.


ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.


आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.


“परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.


येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.


त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली.


यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.


याहवेह यहोशुआस म्हणाले, “ऊठ! तू असा पालथा का पडला आहेस?


Lean sinn:

Sanasan


Sanasan