योना 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला. Faic an caibideil |
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.