Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कुरतडणार्‍या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्‍या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्‍या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्‍या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कुरतडणार्‍या टोळांपासून जे राहिले ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणार्‍या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणार्‍या टोळांनी खाल्ले; चाटून खाणार्‍या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 1:4
19 Iomraidhean Croise  

“जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,


“जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,


“जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन,


त्यांनी आदेश दिला आणि टोळांनी आक्रमण केले, टोळांचे थवेच्या थवे आले;


त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली; त्यांचा हंगाम टोळांनी फस्त केला.


तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन.


ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील.


अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे. टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात.


सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील.


“या भूमीवर आपले ध्वज फडकवा! राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: अरारात, मिन्नी व आष्कनाज. तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा.


“मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.


“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.


कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan