Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय? माझा आत्मा ह्या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:9
12 Iomraidhean Croise  

म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन.


दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?


खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?


माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.


किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यावर लोक म्हणतात, “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”


मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते.


मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?


हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?


म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.


हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.


हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:


“इस्राएलची कुमारी पडली आहे, ती पुन्हा कधीही उठणार नाही, तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे, तिला उठविणारा कोणीही नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan