Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मित्र मित्रास फसवितो, आणि कोणीही सत्य बोलत नाही. त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जो तो आपल्या शेजार्‍याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:5
32 Iomraidhean Croise  

मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना.


तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय? तू उपहास करीत असताना, कोणी तुझा निषेध करणार नाही का?


तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो.


त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला


तुझी जीभ कपट रचते तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते.


तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला


तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.


जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात.


नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो.


कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.


धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.


हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही.


माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”


तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.


कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे.


“माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.”


आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.


म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.


“ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; ते सत्याने या भूमीत विजय मिळवित नाहीत. ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” असे याहवेह जाहीर करतात.


त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.


परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, तो अग्नीने देखील निघाला नाही.


तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते.


“हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या.


लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?


आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो?


यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत.


ज्या लबाड बोलणार्‍या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे.


नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan