Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आपापल्या शेजार्‍याविषयी सावध असा. कोणाही बंधूचा विश्वास धरू नका; कारण प्रत्येक बंधू खास ठकवतो, प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:4
28 Iomraidhean Croise  

यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”


आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास, मी नष्ट करेन; दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.


जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;


जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.


शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.


कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.


दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.


याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:


खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.


याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.


या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात, आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत.


तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.


ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.


त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.


तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात.


“ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.


आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो?


तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल.


“भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.


आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील.


आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्‍यांना प्रभू शिक्षा देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan