Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:21
17 Iomraidhean Croise  

याहवेहनी खाल्डियन लोकांच्या राजाला त्यांच्याविरुद्ध आणले, ज्यांनी त्यांच्या तरुण पुरुषांना मंदिरात तलवारीने मारले आणि तरुण पुरुष किंवा तरुण स्त्रिया, वृद्ध किंवा जे अशक्त होते त्यांनाही सोडले नाही. परमेश्वराने त्या सर्वांना नबुखद्नेस्सरच्या हाती दिले.


तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;


मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.


म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.


“आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात?


म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.


परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे, हा क्रोध मला आवरून धरवत नाही. “मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर आणि तरुणांच्या गटांवर ओततो; दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील, आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील.


म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी या लोकांच्या मार्गात अडथळे पाठवेन. त्यावर मातापिता आणि लेकरे सारखेच अडखळतील. शेजारी आणि मित्र नाश पावतील.”


नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही.


आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.


शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!


“इस्राएलची कुमारी पडली आहे, ती पुन्हा कधीही उठणार नाही, तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे, तिला उठविणारा कोणीही नाही.”


जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.


“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan