Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:10
30 Iomraidhean Croise  

“पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.


“जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते आणि जी तुमची भूमी उजाड झाली, ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल, आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील.


अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.


माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.


किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यावर लोक म्हणतात, “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”


रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.”


सिंहगर्जना करतात; त्यांनी त्यांच्यावर मोठ्याने गर्जना केली. त्यांनी त्यांची भूमी उद्ध्वस्त केली; त्यांची गावे जाळली व वैराण केली आहेत.


त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’


सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.


तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; लोक आणि पशू पलायन करतील.


“ ‘आपले केस कापून टाक, ते फेकून दे; आणि वनस्पतिहीन पर्वतावर विलाप कर, कारण याहवेहने आपल्या क्रोधामुळे या पिढीला धिक्कारले आहे व त्यांचा त्याग केला आहे.


तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे.


“याकारणास्तव मी रडत आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही, माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही. माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत. कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.”


माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.


सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.


“किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला,


“मानवपुत्रा, सोरसाठी विलाप कर.


ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही.


मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही.


तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.


म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.


अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.


हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.


हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:


यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात: “सर्व रस्त्यांवर विलाप होईल आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल. तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्‍यांनाही बोलाविले जाईल; रडण्यासाठी शोक करणार्‍यांना बोलाविले जाईल.


त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”


म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan