Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत, कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,” खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने याचा विपर्यास केला आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ‘आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे नियमशास्त्र आमच्याजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पाहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:8
18 Iomraidhean Croise  

जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही.


विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.


त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.


वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.


तुमच्या पूर्वपित्याने पातके केली; ज्याला मी पाठविले, कि तुम्हाला माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्यास शिकवावे.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


“ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.


याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.


“माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”


“ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?


मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी ते परकीय मानले.


अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.


येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”


ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले


Lean sinn:

Sanasan


Sanasan