यिर्मया 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय? Faic an caibideil |
“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.