Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:18
12 Iomraidhean Croise  

हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.


म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; मला आवेगाने रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशामुळे माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.”


संदेष्ट्याविषयी: माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, कारण याहवेह व त्यांचे पवित्र शब्द.


अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.


आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.


मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan