यिर्मया 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आम्ही इथे का बसलो आहोत? एकत्र होऊ या! आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू आणि तिथेच मरू! कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे. Faic an caibideil |
आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या.