Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यास्तव मी त्यांच्या स्त्रिया इतर पुरुषांना देईन आणि त्यांची शेतीवाडी नवीन मालकांना देईन. त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:10
28 Iomraidhean Croise  

तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.


आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.


मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.


त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”


नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”


तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.


“परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”


इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे.


तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’


मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.


नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत.


तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.


त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”


तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”


याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.


मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.


या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत.


अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan