Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:7
12 Iomraidhean Croise  

जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.”


“विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.


जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल;


त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल.


आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.


त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.


पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.


याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,


यरुशलेमबद्दल मी विचार केला, ‘निश्चितच तू माझे भय धरशील; आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ तेव्हा तिचे आश्रयस्थान उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, पण तरीही पूर्वीसारखीच भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”


आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan