Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:26
44 Iomraidhean Croise  

याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले.


पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.


परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले,


त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.


तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.


याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.


परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.


“त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.


अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल.


तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत.


माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?


परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”


परंतु तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा अधिक दुष्टपणा केला आहे. पाहा, माझी आज्ञा पाळण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने वागता.


परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते.


“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ”


तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!


गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत.


याहवेह म्हणतात, “पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकविला व सर्व संकटे तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली.”


आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),


कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात.


केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात.


ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.


‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.


पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.


“म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ”


“याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!


हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.


मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ? माझे कोण ऐकेल? त्यांचे कान बंद झाले आहेत त्यांना ऐकूच येत नाही. याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते; त्यांना ते सुखद वाटत नाही.


मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’


पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.


याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.


“हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.


“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.


“म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय?


आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही.


माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही.


“पण त्यांनी माझ्या संदेशाकडे लक्ष देण्याचे नाकारले; त्यांनी हट्टीपणाने माझ्याकडे पाठ केली व आपल्या कानात बोटे घातली.


तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’


“पण शेतकर्‍यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’


मग जा आणि ज्याचा तुमच्या पूर्वजांनी आरंभ केला होता ते पूर्ण करा.


“अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता!


तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.


याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan