यिर्मया 7:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. Faic an caibideil |
मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.
म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्या गोष्टी करणे निवडले.”
पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.