Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा! उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू! हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे. आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 “तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:4
14 Iomraidhean Croise  

जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो, किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो,


दिवस संपेपर्यंत आणि सावली जाईपर्यंत, खडतर पर्वतावरच्या हरिणांसारखा किंवा लहान वत्सासारखा हे प्रियतमा, माझ्याकडे परत ये.


मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,


सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.


“त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.


त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”


“हंगाम संपला, उन्हाळा सरला आणि तरीही आमचे तारण झाले नाही.”


राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: युद्धासाठी सुसज्ज व्हा! योद्ध्यांना आव्हान करा! तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.


ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”


याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.


गाझाचा त्याग करण्यात येईल आणि अष्कलोन ओसाड पडेल. भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल आणि एक्रोन समूळ उपटले जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan