Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ते सर्व फितुर्‍यांतले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात; ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात. ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:28
19 Iomraidhean Croise  

मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.


तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.


जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.


अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”


परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत.


ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”


म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.


“ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; ते सत्याने या भूमीत विजय मिळवित नाहीत. ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” असे याहवेह जाहीर करतात.


“तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.


तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.


“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.


दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,


“ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.


राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan