Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे, हा क्रोध मला आवरून धरवत नाही. “मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर आणि तरुणांच्या गटांवर ओततो; दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील, आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून मी परमेश्वराच्या रागाने भरलो आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओतणार आहे. पुरुष व त्याची पत्नी असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:11
22 Iomraidhean Croise  

तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;


मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.


तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.


म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.


परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. निश्चितच, मी ते करू शकत नाही.


हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?


“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही.


आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.


कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.


“माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना प्रभूने नाकारले आहे; माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास फर्माविले आहे. त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.


पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.


इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील.


तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.


वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.


परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.


मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.


त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.


जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते.


ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”


नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan