Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:1
19 Iomraidhean Croise  

तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.


बेथलेहेम, एटाम, तकोवा,


रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.


त्यांचा पुढील भाग तकोवाच्या लोकांनी दुरुस्त केला. परंतु त्यांच्यातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या मुकादमाच्या देखरेखीखाली कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्याचे टाळले.


ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील.


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. काही लोक झुडूपात लपून बसतात; आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. सर्व नगरे उजाड पडली आहेत; कोणीही त्यात राहत नाही.


याहवेह असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र भडकविले जात आहे.


तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.


नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?


काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्‍या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे, पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.”


परंतु यरुशलेम शहरात राहणार्‍या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत.


तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan