Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सर्व सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही ते रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून ते अराबाह च्या दिशेने पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:7
17 Iomraidhean Croise  

तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळ काढला,


मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”


आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली.


निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.”


चला, आता आपण रात्री हल्ला चढवू आणि तिच्या गडांचा नाश करू!”


“त्यांच्यातील राजपुत्र आपले सामान आपल्या खांद्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळी निघेल आणि त्याला जाण्यासाठी भिंतीत खोदून एक खिंडार खोदले जाईल. भूमी दिसू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल.


दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा.


बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!”


मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल.


“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.


तुमच्यातील प्रत्येक भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल. तुम्ही हर्मोनात आपणाला टाकाल.” असे याहवेह म्हणतात.


तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.


हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा, किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात, जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते, जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?


Lean sinn:

Sanasan


Sanasan