Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:12
16 Iomraidhean Croise  

दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.


यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.


कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.


पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.”


हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.


आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा.


हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.


आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली:


मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.


रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटे पाडून टाकली.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, 832 लोक यरुशलेममधून;


यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला.


जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan