Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग त्याने सिद्कीयाचे डोळे फोडले; बाबेलच्या राजाने त्याला बेड्या घालून बाबेलास नेले व त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत त्याला कैदेत ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:11
7 Iomraidhean Croise  

त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’


मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले.


बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे.


त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल.


“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.


हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan