यिर्मया 51:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
9 “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’
9 आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.
9 बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे.
परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले.
आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.
ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.
ते पुन्हापुन्हा अडखळतील; ते एकमेकांवर कोसळून पडतील. ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत आपण परत जाऊ, या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’
तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.
बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे.
ते माझ्यापासून बहकले आहेत म्हणून त्यांचा धिक्कार असो! त्यांचा नाश होवो, कारण त्यांनी माझ्याविरुद्ध विद्रोह केला आहे. मला त्यांचा उद्धार करावयाची इच्छा होती, पण ते माझ्याबद्दल खोटे बोलतात.
मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.