Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:59 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

59 सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

59 यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

59 महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:59
6 Iomraidhean Croise  

कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.


त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:


आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.


तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले.


यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:


सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan