यिर्मया 51:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध केलेल्या अपराधांनी त्याचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास त्यांचा देव, सेनाधीश परमेश्वर ह्याने सोडले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही. Faic an caibideil |
आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.