Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 “शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:41
15 Iomraidhean Croise  

हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’


खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न, बाबेलच्या लोकांचा अभिमान आणि गौरव, सदोम आणि गमोराप्रमाणे परमेश्वराकडून उद्ध्वस्त केल्या जाईल.


तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे!


तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.


जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?


कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे!


बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


समुद्रतटावर वसलेले तुला पाहून घाबरून जातात; त्यांचे राजे भीतीने कापतात आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.


आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.


महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे.


मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”


याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan