Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे, कारण याहवेहने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प कायमचा आहे— बाबेलची भूमी ओसाड होईल जेणेकरून तिथे कोणीही राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:29
25 Iomraidhean Croise  

जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत, ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात: “हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते.


पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.


परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील.


तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील.


बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.


बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.


बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.


तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात.


तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— मेदिया राजे, त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.


दान इथून शत्रूच्या घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. ते भूमी आणि त्यात जे काही आहे, हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.


पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.


“यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय, आणि तिच्यात राहणारे सर्व शोक करणार नाहीत काय? संपूर्ण पृथ्वी नाईल नदीसारखी उठेल; ती नील नदीप्रमाणे खवळेल आणि मग इजिप्तच्या नदीप्रमाणे बुडून जाईल.


तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan