Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “बाबिलोन व बाबिलोनचे लोक यांनी सीयोनाशी जे दुष्कृत्य केले, त्याबद्दल मी तुझ्या डोळ्यादेखत त्यांची परतफेड करेन.” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:24
25 Iomraidhean Croise  

इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.


“एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.


याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.


शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, मंदिरातून येणारा गलबला ऐका! आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या याहवेहचा हा ध्वनी आहे.


अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.


तर मग बाबेलची लूट करण्यात येईल; ते सर्व तिची मनसोक्त लूट करतील,” असे याहवेह जाहीर करतात.


तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.


“बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.


तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी शेतकर्‍यांचा आणि बैलांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी राज्यपालांचा आणि अधिपतींचा संपूर्ण नाश करेन.


सीयोनचे रहिवासी म्हणतात, आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” यरुशलेम म्हणते, “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.”


“जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे बाबेलचा पाडाव होईल.


बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल; तिचे योद्धे बंदी बनविले जातील, आणि त्यांचे धनुष्य मोडून टाकण्यात येतील. कारण याहवेह परतफेड करणारे परमेश्वर आहेत; ते पुरेपूर परतफेड करतील.


हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.


“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”


पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.


त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan