Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुझ्या द्वारे मी घोडा व स्वार ह्यांचे तुकडे तुकडे करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:21
14 Iomraidhean Croise  

दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.


हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.


नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: “मी याहवेहला गीत गाईन, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात फेकले आहेत.


मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”


फारोहचे रथ व सैन्य त्यांनी समुद्रात उलथून टाकले. फारोहचे सर्वोत्तम अधिकारी तांबड्या समुद्रात बुडून गेले.


ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले:


तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! ते दुर्बल होतील. तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! त्यांची लूट केली जाईल.


माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.


सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: “मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे, मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन, आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल. मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही. तुझ्या संदेशवाहकांचे आवाज यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.”


सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल.


एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.


त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात.


या आणि राजांचे, कप्तानांचे व मोठमोठ्या सेनाधिकार्‍यांचे मांस खा! घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे, सर्व लहान, थोर, स्वतंत्र, दास यांचे मांस खावयास या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan