Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; तिच्या विनाशाच्या दिवशी ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी बाबेलवर परदेशीय पाठवीन; ते त्याला उफणतील व त्याचा देश उजाड करतील; कारण ते संकटसमयी त्याला चोहोकडून घेरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:2
9 Iomraidhean Croise  

तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.


तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह असे म्हणतात— “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन आणि सर्व बाबेलच्या लोकांना ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन.


मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.


“धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,


गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”


तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्‍या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्‍यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.


खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan