यिर्मया 50:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 “पाहा, जसा सिंह यार्देनेच्या दाट झुडुपांतून बाहेर येतो, तसा तो मजबूत वस्तीवर येईल. कारण ते एकाएकी तिच्यापासून पळून जातील, असे मी करीन. आणि जो मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन; कारण माझ्यासारखा कोण आहे? आणि मला कोण आज्ञा देईल? आणि कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?” Faic an caibideil |