Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्‍याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:8
15 Iomraidhean Croise  

या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”


“जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्‍याच्या दाराशी दडून बसलो आहे,


तुम्ही व्यभिचार करू नका.


तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.


तो असा मनुष्य आहे जो दुसर्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो; तिला स्पर्श करणार्‍या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.


तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”


सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.


कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.


“तुम्ही जे माझे वतन लुटता, तुम्ही आनंद व उल्हास करतात, तुम्ही धान्य मळणार्‍या कालवडीप्रमाणे बागडता आणि घोड्यांसारखे खिंकाळत असाल,


बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.


तुझ्यातील एक पुरुष त्याच्या शेजार्‍याच्या पत्नीशी निंद्यकर्म करतो, तर दुसरा त्याच्या सुनेला भ्रष्ट करतो आणि अजून दुसरा त्याच्या बहिणीला, त्याच्याच पित्याच्या मुलीला भ्रष्ट करतो.


तुम्ही व्यभिचार करू नका.


तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्‍याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan