Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:6
38 Iomraidhean Croise  

याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले.


मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे.


आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.


मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.


ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.


रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.


तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.


कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध सतत आमच्यासह असतात आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:


जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!


सिंहगर्जना करतात; त्यांनी त्यांच्यावर मोठ्याने गर्जना केली. त्यांनी त्यांची भूमी उद्ध्वस्त केली; त्यांची गावे जाळली व वैराण केली आहेत.


ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


“या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?


सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.


तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.


तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.


याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला हे कळेल.


सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे; राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे. त्याने आपले निवास सोडले आहे. तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी. तुमची नगरे उजाड होतील आणि निर्जन होतील.


“यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”


मग हे लोक परत का वळले नाही? यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते? ते कपटाला चिकटून राहिले आहेत; ते वळण्यास कबूल होत नाहीत.


आकाशातील करकोचाला तिचे निवडलेले ऋतू माहीत आहे, आणि तसेच कबुतर, बगळा व निळवी देखील त्यांच्या स्थलांतराच्या वेळेकडे लक्ष ठेऊन असतात. परंतु माझ्या लोकांना माहीतच नाही याहवेहच्या काय अपेक्षा आहेत.


तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.


प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.


तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.


तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली.


“पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.


“यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.


कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.


त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;


तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.


“आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात.


हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan