Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; ते न्याय करीत नाहीत. अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:28
24 Iomraidhean Croise  

हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.


त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत, परंतु तुमच्या नियमशास्त्राने मी सुखावतो.


तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.


असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.


होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.


गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.


तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.


हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?


तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील.


याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.


जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,


शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”


विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’


मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत.


लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan