Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:27
14 Iomraidhean Croise  

हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.


त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.


हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?


मग हे लोक परत का वळले नाही? यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते? ते कपटाला चिकटून राहिले आहेत; ते वळण्यास कबूल होत नाहीत.


तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.


“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.


मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.


त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात जे त्यांच्या दैवतांची मंदिरे हिंसाचार व लबाडीने भरतात.


तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan