Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 ते स्वतःस असे म्हणत नाहीत, ‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू, जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात, जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ‘जो परमेश्वर आमचा देव आम्हांला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू,’ असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:24
27 Iomraidhean Croise  

“पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”


गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”


पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत माझे शब्द ते वसंत ऋतुतील पावसासारखे प्राशन करीत.


मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील?


ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.


ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.


तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे.


तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.


जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.


या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.


तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.


ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील.


त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.


“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील.


सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.


“हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.


“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.


अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.


तरी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष दिली: त्यांच्याच दयेने तुमच्यासाठी आकाशातून पाऊस पाडतात, ऋतूमध्ये पीक देतात; ते तुम्हाला भरपूर अन्न पुरवितात आणि तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतात.”


प्रत्येक ॠतूत उत्तम पिके मिळावीत यासाठी याहवेह त्यांच्या आकाशातील अद्भुत असे पावसाचे भांडार तुम्हासाठी उघडतील व तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट ते आशीर्वादित करतील. अनेक राष्ट्रांना तुम्ही उसने द्याल, पण तुम्हाला उसने कधीही घ्यावे लागणार नाही.


प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्‍या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्‍या पावसाची धीराने वाट पाहतो.


त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan