Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:1
29 Iomraidhean Croise  

एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”


कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”


याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.


मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.


प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.


माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील? कुकर्मी लोकांविरुद्ध माझ्याकडून कोण लढेल?


पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?


सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.


शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते:


मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.


कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.


“तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात.


त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले:


मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे, परंतु ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांच्यातील कोणीही आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करीत नाही, असे म्हणत नाही की “हे मी काय केले?” प्रत्येकजण आपल्या निवडलेल्या मार्गाचा पाठपुरावा करतो जणू एखादा घोडा युद्धात धाव घेतो.


बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.


म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?


“या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही.


याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’


पण हे दानीएला, गुंडाळीतील ही वचने गुप्त ठेव आणि गुंडाळी शेवटच्या काळासाठी मोहोरबंद करून ठेव. पुष्कळजण इकडून तिकडे फिरतील आणि ज्ञान वाढत जाईल.”


शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!


आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.


व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील.


“शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व आपल्या दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांत व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’


आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan