Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ददानातल्या रहिवाश्यांनो, पळा! माघारी फिरा! जमिनीतल्या विवरात रहा. कारण मी त्यास शिक्षा करणार आहे त्या समयी मी एसावाची अरिष्टे त्याच्यावर आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:8
22 Iomraidhean Croise  

जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.


अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,


माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.


ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;


तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.


मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा.


“जो कोणी दहशतीपासून दूर पळेल तो खड्ड्यात पडेल, जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल, तो पाशात सापडेल. कारण मी मोआबावर तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे. याहवेह असे जाहीर करतात.


पळा, जीव घेऊन पळा! रानावनात झुडूपागत व्हा.


“लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.


त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.


तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.


“बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.


म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.


परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”


एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.


तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.


कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.


आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan