Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अदोमाविषयी, सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, “तेमानात आता काही ज्ञान नाही काय? ज्या कोणाला गोष्टी समजतात त्यांचे चांगले सल्ले अदृश्य झाले आहेत काय? त्यांचे ज्ञान दूर गेले आहे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:7
39 Iomraidhean Croise  

तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)


एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”


याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;


एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.


एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,


योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.


म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.


केनाज, तेमान, मिब्सार,


जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले.


एलीफाज तेमानीने उत्तर दिले:


हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”


दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”


म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”


म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


एदोम, मोआब व अम्मोन;


ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.


बुद्धिमान लज्जित केले जातील; त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल?


ऊस प्रांतात राहणार्‍या एदोम कन्ये, हर्ष कर व उल्हासित हो. परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.


“एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.


तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.


इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.


परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.


परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan