Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तू खोर्‍यांचा, आपल्या सुपीक खोर्‍यांचा का अभिमान बाळगतेस? अगे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू आपल्या निधींवर भिस्त ठेवून म्हणालीस, ‘माझ्यावर कोण चालून येणार?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल, तू आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवते. तू म्हणते, माझ्याविरूद्ध कोण येईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:4
18 Iomraidhean Croise  

जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात, आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात?


“पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्‍यांचा नाश करून तो बलवान झाला!”


पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका; जरी तुमची संपत्ती वाढत असेल, तरी तिच्यावर मन लावू नका.


धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.


हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”


“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन.


अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.”


कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.


तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.


पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.


याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.


जशी कालवड हट्टी असते, तसे इस्राएली लोक हट्टी आहेत. मग जशी कोकरे कुरणात चरतात, त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील?


जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.


तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan