Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील; त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही हस्तगत केले जातील. लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील, ‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्यांचे सैन्य त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील. केदारच्या लोकांकडून त्यांचे उंट आपणासाठी घेऊन जातील आणि त्यांना ओरडून सांगतील. ‘चोहोकडे सर्व दहशत आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:29
21 Iomraidhean Croise  

मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.


त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.


धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!


कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.


तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही किंवा पिढ्यान् पिढ्या रहिवास करणार नाही; कोणीही अरब त्यांचे तंबू तिथे ठोकणार नाहीत, तिथे कोणीही मेंढपाळ त्यांच्या कळपांना विश्रांती देणार नाहीत.


केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.


माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.


एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.


मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.


दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.


तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.


शेतातून बाहेर जाऊ नका, किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, कारण शत्रूकडे तलवार आहे, आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.


कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.


आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही.


मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते.


ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले.


मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.


जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.


त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल, याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan